आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी गायिका म्हणजे जुईली जोगळेकर. जुईलीने ‘सारेगमप’ पासून मराठी श्रोत्यांच्या मनात आपल्या जबरदस्त आवाजाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने गायलेली अनेक गाणी हीट झाली आहेत. अशा या लोकप्रिय गायिकेला संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील लोकप्रिय गाण्याची भुरळ पडली आहे; जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे.

गायिका कल्पना गंधर्व यांनी गायलेलं ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील ‘एक बार देख लीजिए’ हे लोकप्रिय गाणं जुईली जोगळेकरने तिच्या गोड आवाजात गायलं आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विशेष म्हणजे जुईलीने ‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्रींप्रमाणे लूक करून गाणं गायलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. जुईलीच्या आवाजाच कौतुक केलं जात आहे. तिच्या या व्हिडीओचं प्रोडक्शन नवरा, गायक रोहित राऊतने केलं आहे.

हेही वाचा – Video: सतत आयपॅड बघत असल्यामुळे लेकीवर ओरडली क्रांती रेडकर, पण मुलीने दिलं जबरदस्त उत्तर, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनच्या साधेपणाने वेधलं लक्ष, पत्नीसह ५ स्टार हॉटेलमध्ये नाही तर जेवला ढाब्यावर, फोटो व्हायरल

जुईलीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तू माझी सर्वात आवडती गायिका आहेस”, “बापरे…ओळखायला नाही आलीस गं, खूप गोड दिसतेय आणि गोड गातेस सुद्धा”, “मला मूळ गाण्यापेक्षा हे गाणं खूप आवडलं”, “व्वा, खूप छान दिसतेस आणि आवाजही खूप भारी आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. चाहत्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेवर जुईलीने आभार व्यक्त केले आहेत.

जुईलीच्या या व्हिडीओला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. जुईलीचा हा व्हिडीओ पाहून रोहित राऊतने देखील कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितेश चव्हाणच्या बहिणी म्हणून झळकणार ‘या’ चार अभिनेत्री, नवा दमदार प्रोमो पाहा

दरम्यान, जुईली व रोहित ही मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. जुईली व रोहितच्या लग्नाला दुसरं वर्ष सुरू झालं असून २०२२मध्ये दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा, लग्न झालं होतं. २३ जानेवारी २०२२ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले होते. पुण्यातील ढेपे वाड्यात जुईली व रोहितचा धुमधडाक्यात लग्न झालं होतं. या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती.