‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं दुसरं पर्व सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस पडली आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी गौरी-जयदीपला भरभरून प्रेम दिलं तितकंच आताही नित्या-अधिराज्यवर प्रेम करत आहेत. अशातच या मालिकेतील पहिल्या पर्वात झळकलेला अभिनेता लवकरच बाबा होणार आहे; ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या पहिल्या पर्वात झळकलेला उदय शिर्के-पाटील म्हणजे अभिनेता संजय पाटील बाबा होणार आहे. नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील खास क्षणाचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ची महत्त्वाची धुरा सांभाळणारा अभिनेता सोडणार कार्यक्रम, कारण सांगत म्हणाला…

अभिनेता संजय पाटीलने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “कुणीतरी येणार येणार गं” फोटोंमध्ये संजय व त्याची पत्नी अबोली पाटील या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे. डोहाळे जेवणासाठी दोघांनी छान लूक केला होता. अबोलीने गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर अभिनेत्याने लेव्हेंडर रंगाचा सदरा जिन्सवर घातला होता. दोघं खूप सुंदर दिसत होते.

हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, काय ते? वाचा…

दरम्यान, संजय व अबोली नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. ३१ जानेवारीला अभिनेत्याने बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर संजयने गर्भवती बायकोबरोबर सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

Story img Loader