‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मलिका सुरू होणार आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ही मालिका १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेत हृषिकेश या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता सुमीत पुसावळेची वर्णी लागली आहे. याआधी सुमीत ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत झळकला होता. पण आता मालिकेतून त्याने एक्झिट घेत तो नव्या रुपात भेटीस येणार आहे.

अलीकडेच अभिनेता सुमीत पुसावळे ‘घरोघरी मातील चुली’ या मालिकेत झळकणार असल्याचं जाहीर झालं. तेव्हापासून तो चर्चेत आला आहे. सुमीतने या नव्या प्रवासानिमित्ताने कुटुंबियांबरोबर सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडीओ अभिनेत्याची बायको मोनिका पुसावळेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय मोनिकाने सुमीतसाठी इन्स्टाग्राम स्टोरीवरही खास पोस्ट लिहिल्या होत्या.

हेही वाचा – Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म

‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील सुमीतचा प्रवास संपल्याच्यानिमित्ताने मोनिकाचे काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली. मोनिकाने लिहिलं की, सुमीत तुझ्या कामाबद्दलचं प्रेम, निष्ठा, मामांवरचं प्रेम, विश्वास हे सगळं मी खूप जवळून अनुभवलं आहे. तू मामांचं कार्य घराघरात पोहोचवलं. उन्ह असो, पाऊस असो कधी तू आणि तुझी टीम थांबली नाही. मला आज बायको म्हणून खूप अभिमान वाटतोय. तुला प्रत्येकाने जे प्रेम दिलं आहे ते असंच कायम राहो आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हावी हिच मामांच्या चरणी प्रार्थना. बाळूमामांच्या नावानं चांगभलं. मी तुझ्याबरोबर कायम आहे.

त्यानंतर सुमीतचा ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा प्रोमो शेअर करत मोनिकाने लिहिलं, “शेवटी प्रतिक्षा संपली. सुमीत तुझं खूप खूप अभिनंदन. तुझ्या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा…”

हेही वाचा – Video: लेक व होणाऱ्या सूनेसाठी नीता अंबानीचं शास्त्रीय नृत्य, नेटकरी म्हणाले, “भारतीय संस्कृती…”

दरम्यान, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत सुमीतने साकारलेली बाळूमामांची भूमिका खूप गाजली. याआधी त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत काम केलं होतं.