Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा १ मार्चपासून सुरू झालेला प्री-वेडिंग सोहळा काल, ३ मार्चपर्यंत पार पडला. मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात हा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा झाला. काल शेवटच्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. यावेळी नीता अंबानी यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनेसाठी शास्त्रीय नृत्य सादर केलं. याचा व्हिडीओ ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत, नीता अंबानी ‘विश्वंभरी स्तुति’वर शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहेत. यामध्ये नीता यांनी पारंपरिक लूक केला आहे. गोल्डन रेड साडीत त्या पाहायला मिळत आहेत. नीता अंबानींच्या या सादरीकरणाचं सध्या कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – Video: “संस्कार नसलेली मुलं…”, करीना कपूरच्या छोट्या लेकाच्या ‘त्या’ कृतीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं? पाहा…

“स्वतःच्या संस्कृतीवरील त्यांचं प्रेम अंबानींना आणखी श्रीमंत करतं”, “नीता अंबानी भारतीय संस्कृती प्रवर्तक आहेत”, “खूप सुंदर नृत्य”, “श्रेया घोशालचा आवाज खूप आवडला”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानचा पत्नीसह रोमँटिक डान्स पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. काल, तिसऱ्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. याशिवाय अरिजित सिंह, लकी अली, श्रेया घोषालसह बऱ्याच लोकप्रिय गायकांचा परफॉर्मन्स झाला.