Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची भारतातच नाही तर जगभरात चर्चा होतं आहे. या सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूड सेलिब्रिटींपासून अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक अरिजित सिंह, लकी अली यांच्यासह अनेक गायकांनी परफॉर्म केलं. याचे व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. त्यानंतर स्वरांची उधळण झाली. प्रसिद्ध गायकांनी आपल्या सुमधूर आवाजाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं आणि नाचायलाही भाग पाडलं. याचे व्हिडीओ ‘विरल भयानी’ या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Video: लेक व होणाऱ्या सूनेसाठी नीता अंबानीचं शास्त्रीय नृत्य, नेटकरी म्हणाले, “भारतीय संस्कृती…”

अरिजित सिंह, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंह, उदित नारायण आणि लकी अली यांसारख्या अनेक प्रसिद्ध गायकांचे परफॉर्मन्स झाले. याशिवाय दिलजीत दोसांझ, नीती मोहन, प्रीतम दा यांचा देखील जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: “संस्कार नसलेली मुलं…”, करीना कपूरच्या छोट्या लेकाच्या ‘त्या’ कृतीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं? पाहा…

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. काल, तिसऱ्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला.