‘झी मराठी’ वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही लोकप्रिय मालिका गेल्यावर्षी १३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. यंदा मार्च महिन्यात या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. यानंतर या मालिकेच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेने तब्बल ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘झी मराठी’च्या इतर मालिकांच्या तुलनेत या मालिकेला प्रेक्षकांकडून गेली वर्षभर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाल्यावर अभिनेत्री शिवानी रांगोळेने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मालिकेत अभिनेत्रीने अक्षरा हे पात्र साकारलं आहे. अक्षराला तिचा नवरा अधिपती प्रेमाने मास्तरीण बाई अशी हाक मारत असतो. त्यामुळे आता घराघरांत शिवानी रांगोळेला ‘मास्तरीण बाई’ अशी नवीन ओळख मिळाली आहे.

हेही वाचा : Video : ‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलचा कुटुंबीयांसह ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचा भाऊ अडकणार लग्नबंधनात

“आज आपल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचे ४०० भाग पूर्ण होत आहेत. जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं आणि देत आहेत, तितकंच किंवा त्यापेक्षा खूप जास्त आम्ही आमच्या कामातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आमचा प्रवास खूप मोठा आणि आमचं काम अधिक चांगलं होतं आहे. आमची संपूर्ण टीम, आमचे प्रेमळ निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांना खूप खूप प्रेम. मधुगंधा कुलकर्णी ताई ( लेखिका ) आमच्या मालिकेचा मोठा कणा आहे. याशिवाय दिनेश घोगळे, चंद्रकांत गायकवाड आणि झी मराठीचे खूप खूप आभार” अशी पोस्ट शेअर करत शिवानीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Video : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी इटलीला निघाले रणबीर-आलिया; विमानतळावर गोंडस राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

हेही वाचा : “जात अलग थी, खत्म कहानी”, ‘धडक २’ ची घोषणा! जान्हवीचा पत्ता कट, आता चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

दरम्यान, शिवानी रांगोळेला छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून ओळखलं जातं. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत तिच्याबरोबर अभिनेता हृषिकेश शेलार प्रमुख भूमिका साकारत आहे. याचबरोबर अभिनेत्री कविता लाड या मालिकेत भुवनेश्वरी हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.