रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. यांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला होता. यावेळी मोठमोठे बॉलीवूड व हॉलीवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर आता दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी सगळे सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत.

अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये भव्या क्रूझवर पार पडणार आहे. हे सेलिब्रेशन ३ दिवस होणार आहे. ही क्रूझ इटली ते फ्रान्स असा प्रवास करणार आहे. या सोहळ्यासाठी एकामागून एक सगळेच बॉलीवूड सेलिब्रिटी इटलीला रवाना झाले आहेत.

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पत्रिका चर्चेत, चार दिवस विदेशात क्रूझवर होणार धमाल; अंबानी-मर्चंट कुटुंबातील सदस्य झाले रवाना

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यात आलिया-रणबीरची लाडकी लेक राहाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता इटलीला सुद्धा राहा आपल्या आई-बाबांबरोबर उपस्थित राहणार आहे. रविवारी रात्री उशिरा रणबीर, आलिया व त्यांची गोंडस लेक राहा हे तिघेही इटलीसाठी रवाना झाले. या तिघांनाही मुंबईच्या खासगी विमानतळावर पापाराझींनी पाहिलं. यावेळी एकट्या रणबीरने कॅमेऱ्यासमोर पोज दिली. तर, आलिया लेकीला कडेवर घेऊन चेकिंग पॉईंटच्या दिशेने गेल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : शाहरुखला मिठी मारत सुहाना झाली भावुक; KKR च्या विजयानंतर खान कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडीओ

विमानतळावर पुन्हा एकदा राहाचा गोंडस अंदाज पाहायला मिळाला. यावेळी रणबीर पांढऱ्या टी-शर्ट, बेज पँट आणि क्लीन-शेव्ह लूकमध्ये दिसला. तसंच आलियाने कॅज्युअल लूक केला होता तर, राहाने रणबीरच्या कपड्यांना मॅचिंग असा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. विमानतळावर आलिया-रणबीरपेक्षा पुन्हा एकदा राहाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याचे व्हिडीओ व फोटोज ‘मानव मंगलानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

अनंत आणि राधिका यावर्षी १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न मुंबईत होणार आहे. मुकेश अंबानी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी मुंबईत ग्रँड सेलिब्रेशन करणार असल्याच्या चर्चा आहेत. आतापर्यंत अंबानी व मर्चंट कुटुंबीयांशिवाय आलिया-रणबीर, रणवीर सिंह, महेंद्रसिंग धोनी, सलमान खान हे कलाकार इटलीसाठी रवाना झाले आहेत.