मराठी मनोरंजन विश्वात २०१६ मध्ये ‘सैराट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यानंतर काही महिन्यांनी बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं.

२०१८ मध्ये जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खैतानने केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही. परंतु, यामधील बरीच गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती. आता तब्बल ६ वर्षांनी ‘धडक २’ची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : जान्हवी कपूर दरवर्षी तिरुपती मंदिरात का जाते? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “आईच्या निधनानंतर…”

करणने हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल असं जाहीर केलं आहे. या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडीओला “यह कहानी है थोड़ी अलग क्यूंकि एक था राजा, एक थी रानी – जात अलग थी…खतम कहानी” असं कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झळकणार याबद्दल सांगायचं झालं, तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आल्या आहेत. जान्हवीऐवजी ‘धडक २’ तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर, इशानऐवजी ‘धडक २’मध्ये सिद्धांत चतुर्वेदीची वर्णी लागली आहे.

हेही वाचा : Video : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी इटलीला निघाले रणबीर-आलिया; विमानतळावर गोंडस राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

हेही वाचा : “लाथ मारली, धमक्या दिल्या”, रेल्वे प्रवास करताना अश्विनी कासारला आला ‘असा’ अनुभव, पोलिसांना टॅग करत म्हणाली…

दरम्यान, तृप्ती डिमरी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. तिने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर दिलेल्या इंटिमेट सीनची सर्वत्र चर्चा रंगली होती. ‘अ‍ॅनिमल’मुळे तृप्ती नॅशनल क्रश झाली होती. येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदीबद्दल सांगायचं झालं, तर याआधी तो रणवीर सिंहबरोबर ‘गल्ली बॉय’ चित्रपटात झळकला होता. ‘गल्ली बॉय’मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या मुख्य भूमिका होत्या.