अभिनेत्री तुनिषा शर्मा ‘अलीबाबा: दास्तान-ए-काबुल’ या सब टीव्हीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेचं शुटिंग सुरू असतानाच तिने २४ रोजी सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी या मालिकेतील तिचा मुख्य सह-कलाकार शिझान खानला अटक करण्यात आली आहे. शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेला आता १२ दिवस उलटले आहेत.

तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेचं शुटिंग थांबवण्यात आलं होतं. पण, नंतर निर्मात्यांनी शूटिंग पुन्हा सुरू केलं. मालिकेतील मुख्य अभिनेत्रीचं निधन आणि मुख्य अभिनेता कोठडीत असल्याने मालिका बंद केली जाईल, अशा चर्चा होत्या. पण निर्मात्यांनी त्यास नकार दिला आहे. मालिका बंद करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

तुनिषा शर्मा प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा…”

दरम्यान, मालिकेत तुनिषा शर्माच्या जागी नवीन अभिनेत्रीची वर्णी लागणार असून शिझानच्या भूमिकेसाठीही अभिनेत्याचा शोध सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, मालिकेत या दोघांच्याही जागी नवीन कलाकार घेतले जाणार नाहीत, असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. नवीन कलाकार शिझान-तुनिषाला रिप्लेस करणार नाहीत. त्याऐवजी मालिकेच्या कथानकात बदल केला जाईल आणि वेगळा स्टोरी ट्रॅक चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिझान-तुनिषाचे पात्र वगळले जातील आणि नव्या पात्रांसह नवीन कलाकारांची वर्णी लावण्याच्या विचारात निर्माते दिसत आहेत.

तुनिषा शर्माची आई आणि संजीव कौशल यांचं अफेअर? त्यांनी सर्व आरोपांवर दिली उत्तरं

मालिकेचं शुटिंग पून्हा सुरू झालं असलं तरी बाकी कलाकार आणि सेटवरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. निर्मात्यांनी दुसरा सेट तयार करून तिथं शुटिंग सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरीकडे तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिची आई वनिता शर्मा शिझान आणि त्याच्या कुटुंबियाला तिच्या आत्महत्येस जबाबदार धरत आहे. तर, तुनिषाच्या आईनेच पैशांसाठी अभिनेत्रीला काम करायला लावलं आणि तुनिषा गेल्या तीन वर्षांपासून नैराश्यात होती, असा दावा शिझानच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.