scorecardresearch

Video : खऱ्या आयुष्यात आलिशान घरात राहते ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका, शिल्पा तुळसकरनेच शेअर केला व्हिडीओ

शिल्पा तुळसकरचं खऱ्या आयुष्यातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : खऱ्या आयुष्यात आलिशान घरात राहते ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका, शिल्पा तुळसकरनेच शेअर केला व्हिडीओ
शिल्पा तुळसकरचं खऱ्या आयुष्यातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसतात. या मालिकेमध्ये अनामिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिल्पा तुळसकरने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या या मालिकेमधुळे ती चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शिल्पाने तिच्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “आईनेच तुनिषा शर्माचा गळा दाबला होता, तिला पैसेही…” शिझान खानच्या कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा

शिल्पा तिच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत कुटुंबाबरोबर बऱ्याचदा मजा-मस्ती करताना दिसते. तिने तिची दोन मुलं व पतीसह नववर्षाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. ख्रिसमसच्यानिमित्ताने तिने तिच्या घराची संपूर्ण सजावट केली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तिने शेअर केला.

या व्हिडीओमध्ये शिल्पाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तिने घराच्या हॉलची सजावट सुंदररित्या केली आहे. तसेच एका भिंतीवर शिल्पासह तिच्या कुटुंबीयांचे फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच शिल्पाचं घर किती मोठं आहे हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं.

शिल्पाचं खऱ्या आयुष्यातील घर मालिकेतील घरापेक्षा फारच सुंदर आहे. तिच्या या घराच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे. शिल्पाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘तू तेव्हा तशी’मध्ये ती साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 09:19 IST

संबंधित बातम्या