सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम नसतो. काही दिवासांपूर्वी एका युवकाचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या युवकाचे नाव विपिन साहू असे आहे. खरेतर या व्हिडीओमुळे विपिनला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता हाच विपिन एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

नुकताच सलमान खानच्या बिग बॉस या शोमधून बाहेर आलेली पंजाबची गायिका शहनाज गिल आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. ‘मुझसे शादी करोगे’ असे या कार्यक्रमाचे नाव असून मनीष पॉल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमात शहनाज स्वत:साठी नवरदेव शोधणार आहे. शहनाजचे मन जिंकण्यासाठी अनेक स्पर्धकांनी नावे नोंदवली आहेत. त्यात विपिन देखील सहभागी आहे.

काही दिवसांपूर्वी विपिनचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो सुरुवातीला खूप उत्साही असतो. पण एका उंचीवर गेल्यावर त्याला भीती वाटू लागते. तो इतका घाबरतो की त्याच्या तोंडून शिव्या निघू लागतात.

त्याचा हा घाबरलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नंतर नेटकऱ्यांनी त्यावर मीम्सचा पाऊस देखील पाडला.