शनिवारी भारताच्या वेटलिफ्टर मिराबाई चानू यांनी टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये पहिल्याच दिवशी भारतासाठी पदककमाई केली. त्यांनी महिलांच्या ४९  किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. या क्षण प्रत्येक भारतीयाने साजरा केला. अनेक कलाकरांनी ट्वीट करत मिराबाई चानू यांच अभिनंदन केलं. याच वेळी बॉलीवूडची अभिनेत्री टिस्का चोप्रानेही ट्वीट केलं. पण हे ट्वीट करत असतांना तिच्याकडून एक चूक झाली. काही वेळातच ही चूक लक्षात येताच टिस्काने ते ट्वीट डिलीट करत दिलगिरी व्यक्त करणारे ट्वीट केले. तिच्या ट्वीटवर नेटीझन्सच्या मिश्र प्रतिकिया उमटल्या आहेत.

काय होत ट्विट?

कंगना रनौत, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूर सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत मिराबाई चानू यांचा ऐतिहासिक विजय साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्रानेही आपल्या ट्विटरवर वेटलिफ्टिंग चॅम्पियनचे अभिनंदन केले होते. तथापि, टिस्काने ट्वीट करतांना मिराबाईंचा फोटो टाकण्याऐवजी इंडोनेशियन वेटलिफ्टर कान्टिकाचा फोटो शेअर केला. “तुझा आम्हाला अभिमान आहे मुली!!” असं लिहत टिस्काने मिराबाई यांना टॅगही केले होते.

tisca chopra tweet
टिस्का चोप्रा यांनी डिलीट केलेलं ट्वीट

ट्वीट डिलीट करत दिलगिरी व्यक्त

नंतर, अभिनेत्रीने ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली, “आनंद झाला की तुम्हा लोकांना मज्जा आली! ही एक मोठी चूक होती, मला माफ करा .. तरीही याचा अर्थ असा नाही की मला मिराबाई चानू यांचा अभिमान नाही.”

नेटीझन्सच्या मिश्र प्रतिक्रिया

टिस्काने ट्वीट जरी डिलीट केलं असलं आणि दुसर दिलगिरी व्यक्त करणारे ट्वीट जरी केलं असलं तरी यावर नेटकऱ्यांनी मात्र, मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “होत असं. आपण माणूस आहोत” असं ट्वीट करत टिस्काला पाठिंबा दिला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला,“तुमची चूक तुम्ही मान्य केली हे महत्त्वाचं”. तिसरा नेटकरी म्हणाला, “चूक करणं ठीक आहे कारण आपण माणूस आहोत.” तर एक नेटकरी टिस्काला टोला लगावत म्हणाला, “तुम्हाला खेळाची आणि खेळाडूंची काहीही पडलेली नाही तुम्हाला फक्त शो ऑफ करायचं आहे.” अशी प्रतिकिया नोंदवली आहे.