दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. चित्रपटाला राजपूत संघटनांचा होत असलेला तीव्र विरोध आणि सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांची कारणं देत निर्मात्यांकडे चित्रपट परत पाठवल्याने हा निर्णय घेण्यात आला. १ डिसेंबर रोजी ‘पद्मावती’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. निर्मात्यांकडून प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

एकीकडे ‘पद्मावती’चा वाद सुरू असताना दुसरीकडे भारताच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब पटकावला. हा किताब पटकावणारी मानुषी सहावी भारतीय तरुणी ठरली. १७ वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे. चीनमधील सान्या येथे शनिवारी ‘मिस वर्ल्ड २०१७’ ही स्पर्धा रंगली होती. याव्यतिरिक्त मनोरंजन विश्वातील आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूया…

भारताची मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड २०१७’

‘न्यूड’ची कथा माझ्या लघुकथेवरुन चोरली, हिंदी लेखिकेचा रवी जाधव यांच्यावर आरोप

हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने केले ‘पद्मावती’चे समर्थन

Padmavati Controversy : मोदी सरकारच्या नावाखाली सर्वांचे दुकान चालते- शबाना आझमी

‘लैंगिक शोषण फक्त सिनेसृष्टीतच नाही, तर घरोघरी होते’

तीन वर्षांपूर्वीच्या फ्रोजन बीजापासून डायना हेडनला मिळणार मातृत्त्वाचे सुख

Padmavati controversy : ‘पद्मावती’च्या वादावर दीपिकाचे वडील म्हणतात..

राहुल रॉयचा भाजपमध्ये प्रवेश

जाणून घ्या, विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ची पहिल्या दिवसाची कमाई