सध्या सर्व मराठी रसिकांचे लक्ष्य वेधले आहे ते झी मराठी पुरस्कार सोहळ्याने. झी मराठी वाहिनीवरील कुठली सून ठरणार सर्वोत्कृष्ट सून आणि कुठली सासू असेल प्रेक्षकांची आवडती? कोण असेल रसिकांची लाडकी आई आणि कुठल्या ‘बाबां’वर रसिक उमटवणार पसंतीची मोहोर? याबाबत रसिकांची उत्कंठा गेले कित्येक दिवस ताणून धरण्यात आली होती. हीच उत्सुकता आता अधिक ताणून न धरता आम्ही तुम्हाला ‘झी मराठी पुरस्कार २०१४’ मध्ये कोणत्या व्यक्तिरेखेने बाजी मारली ते सांगत आहोत.

१. सर्वोत्कृष्ट मालिका : होणार सून मी हया घरची
२. सर्वोत्कृष्ट कुटुंब : देसाई कुटुंब  – जुळून येती रेशीमगाठी
३. सर्वोत्कृष्ट नायक :  आदित्य- जुळून येती रेशीमगाठी
४.सर्वोत्कृष्ट नायिका : जान्हवी – होणार सून मी हया घरची
५. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री : अस्मिता
६. सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा  पुरुष :  हेगडी प्रधान- जय मल्हार
७. सर्वोत्कृष्ट भावंडं : आदित्य अमित अर्चना – जुळून येती रेशीमगाठी  
८. सर्वोत्कृष्ट जोडी  : जान्हवी – श्री : होणार सून मी हया घरची
९. सर्वोत्कृष्ट आई : माई देसाई – जुळून येती रेशीमगाठी
१०. सर्वोत्कृष्ट वडील : नाना देसाई – जुळून येती रेशीमगाठी
११. सर्वोत्कृष्ट सासरे : नाना देसाई – जुळून येती रेशीमगाठी
१२. सर्वोत्कृष्ट सासू : माई देसाई – जुळून येती रेशीमगाठी
१३. सर्वोत्कृष्ट सून : जान्हवी – होणार सून मी हया घरची
१४. सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा स्त्री : महालक्ष्मी – जय मल्हार
१५. सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा पुरुष : लक्ष्मीकांत गोखले – होणार सून मी हया घरची
१६. सर्वोत्कृष्ट खलभूमिका : शशिकला – होणार सून मी हया घरची
१७. सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा : सुरेश कुडाळकर – जुळून येती रेशीमगाठी
१८. सर्वोत्कृष्ट शिर्षकगीत : जय मल्हार
१९. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक : – निलेश साबळे – चला हवा येऊ द्या
२०. सर्वोत्कृष्ट परीक्षक कथाबाहय कार्यक्रम  : अवधुत गुप्ते – सारेगमप
२१. सर्वोत्कृष्ट कथाबाहय कार्यक्रम  : होम मिनिस्टर
२२. विशेष लक्षवेधी चेहरा :   अदिती खानोलकर – का रे दुरावा
नात्यांचा, आपल्या माणसांचा” साजरा करण्यासाठी, त्या सोनेरी क्षणांचे सोबती होण्यासाठी झी मराठीबरोबरच मराठी कलाक्षेत्रातील कलावंत, कलाप्रेमी आणि रसिक खास उपस्थित होते. गहि-या नात्यांचा हा हृद्य सोहळा झी मराठी वर रविवारी, २६ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता प्रसारित होत आहे.   

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी