वाचा मराठी विनोद.

Live Updates
10:34 (IST) 28 Apr 2024
हास्यतरंग : नाव तरी सांग…

तिचा फोन आला, खूप अकडत अडकत ती म्हणाली,

“विसरुन जा मला.”

मी म्हणालो, “आधी नाव तरी सांग कोण आहेस तू?”

08:31 (IST) 27 Apr 2024
हास्यतरंग : काय मागितलं…

मन्या : मला एकदा अलादिनचा दिवा सापडला होता.

बायको : खरं की काय? मग काय मागितलं तुम्ही जिनीकडं?

मन्या : माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो.

बायको : हो का? मग काय म्हणाला तो?

मन्या : माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला, "आका! क्यूँ मजाक करते हो। शून्याला दहाने गुणलं काय किंवा शंभरनं गुणलं ते शून्यच रहाणार.”

10:30 (IST) 26 Apr 2024
हास्यतरंग : MBBS करतोय…

जन्या : काय रे मन्या! काय करतोस रे तू आजकाल?

मन्या : मी MBBS करतोय.

जन्या : तुला जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतोस अन MBBS कधी करतोस रे?

मन्या : MBBS म्हणजे ‘म्हशी बघत बघत शेती’

07:33 (IST) 25 Apr 2024
हास्यतरंग : जेवण कुठे…

मन्या : डॉक्टर, कालपासून पोटात खूप दुखतय.

डॉक्टर : तू जेवण कुठे करतोस?

मन्या : साहेब, रोज हॉटेलात जेवतो.

डॉक्टर : अरे बाबा, रोज हॉटेलमध्ये नको खात जाऊ.

मन्या : ठीक आहे डॉक्टर साहेब, आतापासून पार्सल करून घरी आणून खाईन.

10:19 (IST) 24 Apr 2024
हास्यतरंग : डिनर करत…

मुलगा : कुठे आहेस?

मुलगी : Mom Dad सोबत

डिनर करत आहे हॉटेलमध्ये.

घरी पोहचल्यावर बोलते.

तु कुठं आहेस ?

मुलगा : तू ज्या भांडाऱ्यात

जेवत आहेस ना,

तिथं तुझ्या मागच्या पंगतीत

मी भात वाढत आहे.

भात लागला तर सांग!

11:14 (IST) 23 Apr 2024
हास्यतरंग : साधारण वर्षभर…

मन्या : ही शाई पाण्याने जाईल?

मतदान केंद्र अधीकारी : नाही!

मन्या : तेलाने?

अधीकारी : नाही!

मन्या : साबणाने?

अधिकारी : नाही!

मन्या : किती दिवस अशीच राहणार?

अधिकारी : साधारण वर्षभर…

मन्या : मग, माझ्या केसांना लावायला थोडी देता का?

10:33 (IST) 22 Apr 2024
हास्यतरंग : साखरेचा डब्बा…

मन्या रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते,

‘’रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?’’

मन्या : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.

08:02 (IST) 21 Apr 2024
हास्यतरंग : एकत्र करा…

उष्माघातापासून वाचण्यासाठी एक नविन रेसिपी, एकदम सोपी

साहित्य -

१ वाटी तांदूळ, १ वाटी मूग डाळ,

१ वाटी मसूर डाळ

१ वाटी उडीद डाळ

१ वाटी तूर डाळ

४ वाट्या ज्वारी

१ वाटी शाबुदाणा

१ वाटी मोहरी

२ चमचे ओवा

१ चमचा खसखस

हे सर्व एकत्र करा

आणि

निवडत बसा…

पण

घराबाहेर पडू नका,

कारण

ऊन प्रचंड आहे.

08:06 (IST) 20 Apr 2024
हास्यतरंग : गरम होतंय…

इतकं गरम होतंय की,

कुणी नुसतं ... "WARM REGARDS"

लिहिलं, तरी राग येतोय...

07:14 (IST) 19 Apr 2024
हास्यतरंग : बायकोला फोन

मन्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो…

दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो

आणि म्हणतो,

“थोडयाच वेळात घरी पोहोचतोय, आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये.”

07:59 (IST) 18 Apr 2024
हास्यतरंग : काय देऊ?...

दुकानदार : बोला काय देऊ?

मन्या : माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक द्या.

दुकानदार : इथेच खाणार की पॅक करून देऊ?

07:41 (IST) 17 Apr 2024
हास्यतरंग : कशी दिसतेय…

बायको : कशी दिसतेय मी आज?

मन्या : छान दिसत आहेस.

बायको : असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी!

मन्या : ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी,

इस मे पगार लग जाती है मेरी सारी.

09:48 (IST) 16 Apr 2024
हास्यतरंग : बँकेचे अधिकारी…

मन्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.

कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.

यावर मन्या म्हणाला, “मला माहीत नव्हतं,

नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”

भोळा स्वभाव, दुसरं काय!

07:13 (IST) 15 Apr 2024
बसचा ड्रायव्हर…

भरधाव बसचा ड्रायव्हर स्टिअरिंगवर मूठ आपटत म्हणाला, “एकही मोठं झाड उरलं नाही या रस्त्यावर.. लाजिरवाणी गोष्ट आहे..”

बसमध्ये बसलेल्या काकूंना भारीच कौतुक वाटलं!

त्या म्हणाल्या, “अय्या, पर्यावरणाचा किती विचार करता तुम्ही! छान हं!..”

ड्रायव्हर (संतापून) : पर्यावरण?… अहो, बसचा ब्रेक लागत नाहीये नीट!

07:50 (IST) 14 Apr 2024
हास्यतरंग : टूथपेस्टमध्ये…

सेल्समन : आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, नीलगिरी, कडुनिंब आणि लवंगही आहे.

मन्या : नक्की ब्रश करायचंय की तोंडात धुरी घालायचीय?

08:46 (IST) 13 Apr 2024
हास्यतरंग : वजन करून…

मन्या : मावशी या सुरमईमध्ये गाभोळी असेल का?

मासेवाली : ए बाबा! म्हावरं वजन करून देतात.

सोनोग्राफी करून नाही.

07:18 (IST) 12 Apr 2024
हास्यतरंग : काठी द्या…

मासेविक्रेता : साहेब! खेकडे घ्या ना! एकदम ताजे आहेत.

मन्या : द्या मग शंभर रुपयांचे.

मासेविक्रेता : पिशवी देऊ का?

मन्या : नको, काठी द्या एक. हाकत नेतो घरापर्यंत.

09:55 (IST) 11 Apr 2024
हास्यतरंग : मिठाईचं दुकान...

मन्या मिठाईचं दुकान उघडतो

आणि जाहिरात देतो.

कामगार पाहिजे...

पात्रता- मधुमेह असला पाहिजे.

10:35 (IST) 10 Apr 2024
हास्यतरंग : पेट्रोल वाढलं...

मास्तर : इकडे आड आणि तिकडे विहीर ह्याचे उदाहरण द्या.

मन्या : गुरुजी पेट्रोल वाढलं म्हणून माझ्या पप्पांनी

इलेक्ट्रिक बाइक घेतली.

आता लोडशेडिंग करायला लागले आहेत.

15:09 (IST) 8 Apr 2024
हास्यतरंग : खराब आंबे द्या...

मन्या : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला : खराब ?

मन्या : हो! हो! खराब, नासके आणि सडके.

आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या!

मन्या : हं! ठेवा बाजूला! आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या.