सागर आणि क्षितीजाच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस होता.. सागरच्या घरी लग्नाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती.. लग्नाचा जणू काही पहिला वाढदिवस असावा, अशी तयारी सुरू होती.. सागर आणि क्षितीजानं सुट्टी घेतली होती.. बाहेर जाण्याचा काही प्लान नव्हता.. आई-बाबांसोबत घरीच वेळ घालवायचा, छान गप्पा मारायच्या, असंच सागर आणि क्षितीजानं ठरवलं होतं.. संध्याकाळी क्षितीजाचे आई-बाबा आणि काही इतर नातेवाईक येणार होते.. त्यासाठी क्षितीजा दुपारीच थोडी खरेदी करायला बाहेर गेली होती.. सागर बेडरुममध्ये बसून लग्नाचा अल्बम पाहात होता.. अल्बमची पानं पलटता पलटता सागर काही वर्षे मागे गेला.. भूतकाळातील काही गोष्टी त्याला आठवू लागल्या..
………………………………………
चार वर्षांपूर्वीची गोष्ट…

“शरयू, ऐक ना तू माझं.. सर्वकाही ठिक होईल.. मी करतोय ना प्रयत्न..?” सागर शरयूला समजावत होता..
“काय ऐकू सागर..? कित्येक महिने मी हेच ऐकतेय.. प्रयत्न करतोय.. अरे पण काय होतंय त्याने..? काहीही झालेलं नाहीये..” शरयूला सागरचं काहीही ऐकून घ्यायचं नव्हतं..

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
titeekshaa tawde and siddharth bodke went to goa
गोव्याचा समुद्रकिनारा, सुंदर व्ह्यू अन्…; तितीक्षा तावडे नवऱ्याबरोबर गेली फिरायला, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

“मग काय ठरवलंस तू..?” सागरनं शांतपणं विचारलं..

“आपण यापुढं सोबत राहू शकत नाही.. आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप वेगळं आहे.. मी खूप फोकस्ड आहे.. मला खूप पुढे जायचंय.. तुझं प्रोफेशन खूप वेगळं आहे.. दोघांच्या स्टेटसमध्ये खूप फरक आहे..” शरयू म्हणाली..

“शरयू, तू सरळ का नाही सांगत की मी तुझ्या योग्यतेचा नाही.. माझी लायकीच नाही..” सागर उद्विग्नतेनं म्हणाला..

“असेल.. तसंही असेल.. पण आपण सोबत नाही शकत नाही..” शरयू थंडपणे म्हणाली..

“शरयू, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. प्लीज मला समजून घे.. आपल्या आठवणी, आपण पाहिलेली स्वप्नं.. प्लीज एकदा सर्व आठवून बघ..” सागर समजवण्याचा प्रयत्न करत होता..

शरयूवर याचा कोणताही परिणाम झाला नाही… शरयूनं टेबलवर ठेवलेली तिची बॅग उचलली आणि ती तिथून निघून गेली… बॅग उचलताना धक्का लागल्यानं एक फोटोफ्रेम पडली होती… सागरच्या स्वप्नांचा आणि काचांचा चुराडा झाला होता.. फ्रेममधील फोटोकडे सागर पाहात होता… त्या फोटोतील व्यक्ती कायमची त्याला सोडून दूर निघून गेली होती.. सागरच्या अश्रूंचा बांध फुटला होता.. तेव्हापासून सागरला कोणी मनापासून हसताना पाहिलंच नाही..

शरयू सोडून गेल्यावर सागर फारसा कुणासोबतही बोलायचा नाही.. ऑफिसमधून घरी आणि घरातून ऑफिस, इतकाच काय तो प्रवास व्हायचा.. आई-बाबांना सागरची काळजी वाटू लागली.. एकुलता एक मुलगा बोलतच नाही, मन मोकळं करत नाही, यामुळं त्यांची चिंता वाढू लागली.. दिवस सरकू लागले तसा सागर धक्क्यातून सावरु लागला.. मात्र तरीही अचानक शरयूची आठवण झाली की पुन्हा मनावरची जखम भळभळून वाहू लागायची..

काही दिवसांनी सागरसाठी एक स्थळ आलं.. सागरच्या आई-वडिलांना मुलगी आवडली.. सागरला या सगळ्यात रस नव्हता.. पण आई-बाबांसाठी त्यानं लग्नाला होकार दिला.. क्षितीजासोबत सागरचं लग्न झालं.. अतिशय मनमिळाऊ, घराला बांधून ठेवणारी, सर्वांमध्ये रमणारी मुलगी सून म्हणून मिळाल्यानं सागरचे आई-बाबा आनंदात होते.. सागरच्या मनात मात्र अद्याप शरयूच्या आठवणी होत्या…

“तुम्ही निघताय का ऑफिसला..? आपण सोबत निघूया का..?” लग्नानंतर ऑफिसला जाताना क्षितीजानं विचारलं..

“नाही.. मला थोडं काम आहे वाटेत.. तुला उशीर होईल.. तू निघ..” सागरनं क्षितीजाला टाळण्याचा प्रयत्न केला..

“मी थांबेन.. काही प्रॉब्लेम नाही..” क्षितीजानं प्रेमानं म्हटलं..

“मला निघायला अजून वेळ आहे.. मग मला एका कामासाठी उलट्या दिशेला जायचंय.. तू प्लीज जा.. उशीर झाला..” सागरनं क्षितीजाला सांगितलं..

“ओके.. चालेल..” सागर आपल्याला टाळत असल्याचं क्षितीजाला ऐव्हाना समजलं होतं… क्षितीजा घरातून निघाली..

क्षितीजा बस स्टॉपवर पोहोचली.. बराच वेळ बस येत नव्हती.. रिक्षा पकडायचा विचार करुन क्षितीजा स्टॉपवरुन थोडी पुढे आली.. तेवढ्यात सागर तिथून बाईकवरुन निघून गेला.. क्षितीजानं सागरला जाताना पाहिलं.. सागरनं आपल्याला टाळल्याचं क्षितीजाच्या लक्षात आलं होतं.. नव्या घरात पाऊल ठेवताना क्षितीजा मनात अनेक स्वप्नं घेऊन आली होती.. मात्र ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं, तोच क्षितीजाला टाळत होता.. क्षितीजा आणि सागर सगळ्यांसाठी पती पत्नी होते.. मात्र त्या दोघांमध्ये कोणतंही नातं तयार झालं नव्हतं.. सागर असं का वागतो, हेच क्षितीजाला कळतं नव्हतं होतं..

“हॅलो क्षितीजा..” ऑफिसमध्ये असताना एक दिवस सागरच्या आईचा फोन आला होता..

“हा.. बोला ना आई.. काय झालं..?” क्षितीजानं विचारलं..

“सागरला पॅरालॅसिसचा अटॅक आला आहे.. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय..”, सागरच्या आईला रडू कोसळलं होतं..

लग्नाला अवघे काही महिने झालेले, त्यात आतापर्यंत एकदाही पतीशी न झालेला संवाद आणि आता त्यात अचानक बसलेला मानसिक धक्का यामुळे क्षितीजा हादरुन गेली होती. काय करावे, काय बोलावे, हेच तिला सुचत नव्हतं..

(पूर्वार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित