मुंबईत बाहेरील राज्यातून जकात चुकवून येणारे तब्बल १३७ कोटींचे हिरे, सोने, चांदी आदी दागिने व अन्य वस्तू महापालिकेच्या जकात विभागाच्या दक्षता पथकाने धडक कारवाई करुन शुक्रवारी जप्त केले. मुंबई सेंट्रल परिसरात करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाई नंतर देय असणारी जकात व दहापट दंड याप्रमाणे एकूण ५७ लाख रुपयांची जकात संबंधितांकडून वसूल करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासातील ही मोठी कारवाई मानली जात असून दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर जप्त मुद्देमाल संबंधितांना परत देण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेकडून हिरे, सोने यांसारख्या मौल्यवान धातूंवर ०.०१ टक्के एवढी जकात आकारण्यात येते. मात्र अनेकदा ही नाममात्र जकात देखील भरण्याचे संबंधितांद्वारे टाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. याच पाश्र्वभूमीवर मुंबई सेन्ट्रल परिसरातून सुमारे २६ आयातदार व त्यांच्या सोबत असलेल्या ८० इसमांकडून पिशव्यांमध्ये सदरचे जड-जवाहिर व अन्य वस्तू आयात करताना दिसल्याने महापालिकेच्या जकात पथकाने त्यांना हटकले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेत भायखळा येथील करनिर्धारण व संकलन खात्याच्या कार्यालयात पडताळणीसाठी नेण्यात आले. या वेळी पडताळणी दरम्यान, १३१ कोटी ७५ लाख एवढय़ा किमतीचे हिरे, रुपये ३ कोटी ७६ लाख किमतीचे १२.५४८ किलो सोने व सोन्याचे दागिने, तर रुपये १ कोटी ३७ लाख एवढय़ा किमतीचे ३६५ किलो चांदी जप्त करण्यात आले. तसेच १४ लाख इतक्या किमतीची ९०० किलो ईमिटेशन ज्वेलरी व रुपये ८१ हजार एवढय़ा किमतीची इतर जकात पात्र सामुग्री जप्त करण्यात आली. सदर जप्त मालावरील जकात व त्यावर दहापट दंड आकारुन ५७ लाख एवढी जकात वसूल करुन संबंधितांकडे जप्त मुद्देमाल स्वाधीन करण्यात आला.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
mira road, Seize 1 thousand 500 kg of Beef, seize beef in mira road, mira road beef, cow guards, gau rakshak, police, beef news, mira road news, marathi news,
मिरा रोड येथे दीड हजार किलो गोमांस जप्त
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी