तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून गुरूवारी एकाच दिवसात स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबद्दलची माहिती दिली. याशिवाय राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ४३ बळी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.  तत्पूर्वी मुंबईत स्वाईन फ्लूचे एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये दहा वर्षांखालील सात मुलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान ठरेल.