News Flash

भरधाव गाडीची पाच जणांना धडक

महात्मा फुले मंडईजवळ मोहंमद अली रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मर्सिडीजची पाहणी करताना पोलीस.

मोहंमद अली मार्गावरील घटना; मद्यपी चालकाला अटक
मोहंमद अली रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मर्सिडीज गाडीने पदपथावर झोपलेल्यांना धडक दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार महिला व एका चार वर्षांच्या मुलाला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चौघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून जखमी महिलेला जी टी रुग्णालयात हलवण्यात आले. पायधुनी पोलिसांनी गाडीचा चालक अमीन खान याला अटक केली असून बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले मंडईजवळ मोहंमद अली रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मर्सिडीज चालवत असलेल्या अमीन खान याचा वाहनावरील ताबा सुटला. साधारण २०० मीटर अंतर चाललेल्या या गाडीने तोपर्यंत वेग घेतला होता. ही गाडी पदपथावर झोपलेल्या महिलांच्या अंगावर धडकली. या दुर्घटनेत मुनीरा शेख (२५)अलिशा शेख (४०), रशिदा शेख (२०), राहुल शेख (४) व आएशा खातून (५०) जखमी झाले. मुनीरा शेख यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इतर जखमींना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:33 am

Web Title: 5 people injured in mohammad ali routes car accident
Next Stories
1 सचिन तेंडूलकर जिमखाना, मातोश्री क्लबचे भूखंड ‘खेळाच्या मैदानांच्या’ यादीतून वगळले?
2 लोहमार्गावरील अपघाती मृत्यूंमध्ये कमालीची घट
3 शाळा, महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीत आता पोलीसही
Just Now!
X