News Flash

अर्नाळा येथील समुद्रकिनारी ५ जण बुडाले, एकाचा मृतदेह हाती

मृतांमध्ये दोन कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अर्नाळा येथील कळंब बीच येथे होळी साजरा करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (गुरूवार) सांयकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून मृतदेहांचा शोध सुरू आहे. एक मृतदेह हाती लागला असून इतर ४ मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
निशा कमलेश मौर्य (वय ३६), प्रशांत कमलेश मौर्य (वय १७), प्रिया कमलेश मौर्य (वय १९, सर्व रा. ०७, २०२ गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड, वसई पश्चिम), कांचन मुकेश गुप्ता (वय ३५), शितल दिनेश गुप्ता (वय ३२, रा. १/१, गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 8:52 pm

Web Title: 5 person drown in kalamb beach nalasopara mumbai
Next Stories
1 महिंद्राकडून शेती क्षेत्रातील खऱ्या हिरोंचा सन्मान
2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार भाजपात प्रवेश करणार
3 मुंबई पोलिसांची तत्परता, 48 तासांत मिळवून दिला रिक्षात विसरलेला लॅपटॉप
Just Now!
X