21 January 2021

News Flash

करोनामुळे एसटीतील ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

१६८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

संग्रहित छायाचित्र

एसटी महामंडळाच्या राज्यातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २३९ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ६५ कर्मचारी उपचार घेऊन घरी परतले, तर १६८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई विभागातीलच मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ, उरण, पनवेल आगारांत ८६ रुग्ण असून यातील एकाचा मृत्यू आणि ठाणे विभागातील खोपट, वंदना, कल्याण, भिवंडी आगारांत एकूण १०१ रुग्ण असून यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एसटीच्या मुंबई सेन्ट्रल मुख्यालयातीलही एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित करोनाबाधित कर्मचारी आणि मृत कर्मचारी हे राज्यातील अन्य आगारांतील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:18 am

Web Title: 6 st employees die due to corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ
2 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेस दोन वर्षे मुदतवाढ
3 राज्यातील वीजग्राहकांना व्याजमुक्ती, पण मुंबईकरांवर व्याजाचा भुर्दंड
Just Now!
X