16 October 2019

News Flash

चेंबूरमध्ये ९० वर्षीय वृद्धेवर तरुणाचा बलात्कार

मद्याच्या नशेत ९० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे उघडकीस आली आहे.

| October 14, 2014 02:16 am

मद्याच्या नशेत ९० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे उघडकीस आली आहे. या वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या विकृत तरुणास अटक केली आहे.चेंबूरच्या टिळकनगर येथील एका झोपडपट्टीत ही वृद्धा राहते. शेजारच्या झोपडीत तिची दोन मुले आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. दोन दिवसांपूर्वी ही वृद्धा आपल्या झोपडीत झोपली होती. तिने दार लोटून घेतले होते. पहाटे दोनच्या सुमारास याच परिसरात राहणारा प्रभू नाडर (२८) हा तरुण या महिलेच्या घरात शिरला. त्याने या वृद्धेचे हात बांधून तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने तिने आपली सुटका करून घेतली आणि कुटुबियांना हा प्रकार सांगितला. तिच्यावर शीव रुग्णालात उपचार सुरू आहेत. टिळक नगर पोलिसांनी आरोपी प्रभू नाडर याला अटक केली असून तो या वृद्धेच्या नातवाचा मित्र आहे. मद्याच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on October 14, 2014 2:16 am

Web Title: 90 year old women raped in chembur
टॅग Rape