07 March 2021

News Flash

माहिममध्ये चार वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या

माहिम पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत

माहिममध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रात्री जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा शोध सुरु झाला होता. सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली आहे. माहिम पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

डीसीपी विक्रम देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित चिमुरडी माहिममध्येच राहत होती. बुधवारी रात्रीपासून ती बेपत्ता होती. तिचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या करण्यात आली आहे. आम्ही याप्रकरणी तपास सुरु केला असून सीसीटीव्ही तपासणार आहोत’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 5:23 pm

Web Title: a girl raped and murdered in mahim
Next Stories
1 रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर; रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात, कर्जे होणार स्वस्त
2 Loksatta Tarun Tejankit: मागील वर्षी कविताने पटकावला पुरस्कार, यंदा नंबर तुमचा?
3 ‘मराठा आरक्षण घटनाबाह्य़च!’
Just Now!
X