News Flash

धक्कादायक! भाईंदरमध्ये माथेफिरू मुलाने केली ८५ वर्षांच्या आईची हत्या

आई सतत वाद घालते या कारणावरून मुलाने आईला ठार केले

संग्रहित छायाचित्र

भाईंदरमध्ये एका माथेफिरू मुलाने त्याच्या ८५ वर्षांच्या आईची हत्या केली आहे. रमा मित्रा असं या वृद्धेचं नाव आहे. तर सोमनाथ मित्रा असं तिच्या मुलाचं नाव आहे. आज सकाळी ८.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सोमनाथ मित्रा या ४५ माथेफिरू मुलाने त्याच्या ८५ वर्षीय आईचं डोकं फरशीवर आपटून तिची क्रूरपणे हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर सोमनाथ रक्ताने माखलेले हात घेऊन खिडकीजवळ बडबड करत होता.

हा सगळा प्रकार ज्या लोकांनी पाहिला त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. भाईंदर येथील मांडवी तलावाच्या शेजारी असलेल्या प्रतीक्षा इमारतीत सोमनाथ आणि त्याची आई रहात होते. आईची हत्या केल्यानंतर सोमनाथ खिडकीजवळ बडबड करत होता. ज्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. सोमनाथ कोणतंही काम करत नव्हता. आई मला सातत्याने नोकरीवरून बोलत होती. तसेच भांडण करत होती त्यामुळे रागाच्या भरात मी तिची हत्या केली अशी कबुली या आरोपीने दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त तुला शिवराज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2019 5:12 pm

Web Title: a psychopath killed his 85 year old mother at bhayander
Next Stories
1 जयदत्त क्षीरसागर यांच्या कारला आठवेळा दंड, मात्र वसुली एकदाही नाही?
2 सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
3 यंदा मुंबईचा कौल कोणाला?
Just Now!
X