05 March 2021

News Flash

मोटरसायकल अपघातात दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

आई व दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

प्रतिकात्मक छायाचित्र

श्वान रस्त्यात आल्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या अपघातात दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघर मनोर रस्त्यावरील धुकटन नाक्याजवळ घडलेल्या अपघातात दोन महिन्याचे बाळ जागीच ठार झाले आहे. रणजित पागी हे आपली पत्नी आशा व मुले आरुष तसेच राजवीर यांच्यासमवेत मोटरसायकलने विक्रमगडहुन पालघरला येत असताना पालघर मनोर धुकटन नाका येथे श्वान आडवे आल्याने रणजीत पागी यांनी आपल्या मोटरसायकलला अचानक ब्रेक लावला. यामुळे मागे बसलेली त्याची पत्नी आशा, दोन महिन्याचे बाळ आरुष तसेच दोन वर्षांचा राजवीर हे रस्त्यावर फेकले गेले. रस्त्यावर पडल्यानंतर मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांना चिरडले. त्यामध्येच दोन महिन्याच्या आरुषचा करून अंत झाला.

दोन दोन वर्षीय राजवीर व त्याची आई ह्या दोन्ही गंभीर जखमी असून पालघर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे. मात्र राजवीर याची प्रकृती खूप गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सेलवास येथील रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले आहे.हे कुटुंब विक्रमगड खांड उघाणीपाडा येथील रहिवासी असल्याचे समजते.या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 8:17 am

Web Title: accident in palghar one dead
Next Stories
1 ‘राज’पुत्र आज अडकणार विवाहबंधनात, दिग्गजांची उपस्थिती
2 ‘ट्राय’चे नवे नियम १ फेब्रुवारीपासून लागू
3 मध्य, पश्चिम रेल्वेवर आज, उद्या ‘ब्लॉक’
Just Now!
X