मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने रविवारी रात्री गळफास लावून घेत आत्महत्या केली. अमित रवि राठोड (वय २०) असे या आरोपीचे नाव असून, घरफोडीच्या गुन्ह्याखाली मुलुंड पोलिसांनी त्याला २९ एप्रिलला अटक केली होती. तीन तारखेपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी रात्री साधारणतः अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने पोलीस कोठडीत असलेल्या शौचालयात जावून अंगातील शर्टने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.