07 March 2021

News Flash

सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?

कूपर रुग्णालयात गेली होती रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला दीड महिना लोटला. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चर्चा सुरूच आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी थेट सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरच आरोप केले. रियावर पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या वादात सुशांत-रियाची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. पण, सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी सुरू कशी झाली माहिती आहे का? (फोटो : सोशल मीडिया/लोकसत्ता)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यानंतर आता सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलीस रियाला सुशांतच्या आत्महत्येविषयी काही प्रश्न विचारु शकतात. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या रुग्णालयाला आज रियाने भेट दिली. ती रुग्णालयाच्या बाहेर असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त समजताच संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी हादरुन गेली. रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण मानली जाते. तिने काल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत शुटिंग मिस करते आहे असं तिने लिहिलं होतं. त्यानंतर काही वेळातच ही दुःखद बातमी समोर आली.

कदाचित सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला पोलीस प्रश्न विचारण्याची, तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकारांनी सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 5:19 pm

Web Title: actor and sushant singh rajputs friend rhea chakraborty will be questioned by the police scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 ‘त्या लोकांच्या कर्मामुळे तुझा जीव गेला’; सुशांतसाठी दिग्दर्शकाचं भावनिक ट्विट
2 “तेव्हा सुशांतला आईची आठवण येत होती”; स्क्रीनशॉर्ट शेअर करत अर्जुनने वाहिली श्रदांजली
3 फुगे विकणाऱ्या महिलेसोबत सुशांतने काढला होता फोटो, व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X