News Flash

ड्रग्ज प्रकरण : चौकशीसाठी अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात

अर्जुनच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून शोधाशोध केली होती.

ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपाल अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कार्यालयात दाखल झाला. सोमवारी अर्जुन व त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्स यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून शोधाशोध केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. बुधवारी गॅब्रीएलाची एनसीबीकडून सुमारे सहा तास चौकशी झाली. त्यानंतर आता अर्जुनची चौकशी होणार आहे.

गेल्या महिन्यात एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.

रविवारी चित्रपट निर्माते फिरोज नाडीयाडवाला यांच्या पत्नी शबाना सईद यांना एनसीबीने अटक केली होती. नाडीयाडवाला यांच्या जुहू येथील बंगल्यातून गांजा हस्तगत केल्याचा दावा एनसीबीने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 11:56 am

Web Title: actor arjun rampal arrives at narcotics control bureau ncb ssv 92
Next Stories
1 VIDEO : मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेली रेडीमनी मॅन्शन
2 ८६ हजार वीज कामगारांचा दिवाळीपासून संपाचा इशारा
3 फटाकेबंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी
Just Now!
X