28 February 2021

News Flash

आदित्य पांचोलीला १९ जुलै अंतरिम पर्यंत जामीन मंजूर

दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय

आदित्य पांचोली

अभिनेता आदित्य पांचोलीला दिंडोशी सत्र न्यायालयाने १९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एएनआयने याबाबत ट्विट केले आहे. बलात्कार प्रकरणी आदित्य पांचोली विरोधात २७ जून रोजी मुंबईतील वर्सोवा ठाण्यात एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम ३७६, ३२८,३८४, ३४१, ३४२, ३२३, ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरण १० वर्ष जुनं असल्यामुळे आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्याविरूद्धचे पुरावे गोळा करणं हे कठीण असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी आदित्य पांचोलीने हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहिण रंगोली चंदेल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर न्यायालयाने या दोघींना याप्रकरणी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 7:50 pm

Web Title: aditya pancholi has been granted interim relief till 19th of july msr87
Next Stories
1 ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ला नऊ वर्ष पूर्ण, पाहा सोनम कपूरची पोस्ट
2 खंडणी प्रकरणी जामिनासाठी अभिजीत बिचुकलेंची हायकोर्टात धाव
3 स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला समन्स
Just Now!
X