News Flash

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन; नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा

आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांना पुत्ररत्न

संग्रहित (PTI)

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांनी गोड बातमी दिली असून त्यांना मुलगा झाला आहे. अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती देण्यात आली आहे. नवजात बाळ आणि श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.

“आकाश आणि श्लोका अंबानी यांना मुंबईत पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. मुकेश आणि नीता अंबानी प्रथमच आजी-आजोबा झाल्यामुळे अतिशय खुश आहेत. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या पणतूचं ते आनंदाने स्वागत करत आहेत. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनाने अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे”, अशी माहिती अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

नीता अंबानींना कधीच मिळणार नव्हतं आई होण्याचं सुख, पण……

आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आकाश आणि श्लोका यांच्या लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं. जगभरात या लग्नाची चर्चा होती. सोशल मीडियावरही कित्येक दिवस त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु होती. या लग्नाला सिनेसृष्टीपासून, क्रिडा जगतामधील बड्या नावांबरोबरच उद्योग श्रेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता.

नीता आणि मुकेश अंबानी यांना तीन मुलं असून आकाश आणि ईशा हे जुळे आहेत. तिसरा मुलगा अनंत सध्या २५ वर्षांचा आहे. परदेशात कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर दिवाळीच्या आधीच अंबानी कुटुंब भारतात परतलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 2:46 pm

Web Title: akash ambani and shloka welcomes baby boy mukesh and nita ambani became grandparents now sgy 87
Next Stories
1 “पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?”
2 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीसमोर हजर, चौकशीला सुरुवात
3 “चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा,” संजय राऊतांची मोदी सरकारकडे मागणी
Just Now!
X