News Flash

अक्सा बीच हत्या : सेक्स केल्यानंतर त्याने केली वहिनीची हत्या

आरोपी हरीश तातडने (३०) धक्कादायक खुलासा केला आहे. मागच्या आठवडयात अक्सा बीचवरील कॉटेजमध्ये इंदू तातड (३३) ही महिला मृतावस्थेत सापडली होती.

( संग्रहीत छायाचित्र )

अक्सा बीच कॉटेज हत्या प्रकरणात आरोपी हरीश तातडने (३०) धक्कादायक खुलासा केला आहे. मागच्या आठवडयात अक्सा बीचवरील कॉटेजमध्ये इंदू तातड (३३) ही महिला मृतावस्थेत सापडली होती. हरीश आणि इंदू दोघेही नात्यामध्ये असून इंदू हरीशच्या चुलत भावाची बायको आहे. हरीश आणि इंदूमध्ये अनैतिक संबंध होते. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार इंदूची हत्या केल्यानंतर हरीशने तिचा नग्न अवस्थेतील मृतदेह तिथेच सोडून पळ काढला होता.

हरीशने आता पोलिसांसमोर त्या दिवशी रुममध्ये नेमके काय घडले त्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. इंदूच्या आयुष्यात हरीश एकमेव पुरुष नव्हता तिचे अन्य पुरुषांबरोबरही अनैतिक संबंध होते. इंदूचे अन्य पुरुषांबरोबरच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ हरीशने पाहिले होते. इंदू आणि हरीश अक्सा बीचवरच्या कॉटेजमध्ये भेटले तेव्हा हरीशने सोबत हत्यार आणले नव्हते.

दोघांनी सेक्स केल्यानंतर हरीश वॉशरुममध्ये गेला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले कि, इंदूने तिच्या बॅगमधून चाकू काढला होता. हरीशला आपल्या बाहेर असलेल्या अनैतिक संबंधांबद्दल कळल्याचे इंदूच्या लक्षात आले होते. हरीशने तिच्या नवऱ्याला याबद्दल काही बोलू नये यासाठी ती चाकू काढून त्याला धमकावत होती. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये वादावादी सुरु असताना इंदूने हरीशवर हल्ला केला.

दोघांमध्ये झटापट झाल्यानंतर हरीशने तिच्या हातातून चाकू हिसकावून घेतला व इंदूवर वार केले. इंदू रक्ताच्या थारोळयात खाली कोसळल्यानंतर घाबरलेल्या हरीशने तिचा नग्न अवस्थेतील मृतदेह तिथेच सोडून त्याने पळ काढला. बाहेर आल्यानंतर त्याने गुजरातला जाणारी बस पकडली. इंदूने वार केल्यामुळे त्याच्या शरीरातूनही रक्तस्त्राव सुरु होता.

हरीश गंभीर जखमी झाल्याचे कंडक्टरच्या लक्षात आल्यानंतर त्याने नवसारी येथे बस थांबवून आपातकालीन सेवेला बोलावले. जेव्हा नवसारी पोलीस तिथे पोहोचले तेव्हा हरीशने हत्येची कबुली दिली व इंदूच्या नवऱ्याला फोन करुन माहिती दिली. हरीशच्या पोटात आणि मांडीवर जखमा झाल्या होत्या. त्याला लगेच सूरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हरीशला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक सूरतला गेले आहे. जर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती मालवणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:19 pm

Web Title: aksa beach murder accused harish tatad indu tatad
Next Stories
1 स्वबळावरच लढणार; अमित शाहांच्या ‘मातोश्री’ वारीनंतरही शिवसेना ठाम
2 कलबुर्गी हत्या प्रकरणातही चिंचवडच्या अमोल काळेचा सहभाग?
3 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ
Just Now!
X