राज ठाकरे, अजित पवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस.. साऱ्याच पक्षांचे नेतृत्व सध्या तरुण वर्गाकडे आले आहे. तरुणांना आकर्षित करण्याकरिताच तरुण नेतृत्व पुढे आणण्यावर सर्वच पक्षांचा भर राहिला आहे.
उपरोक्त पदाधिकारी ४० ते ५० वयोगटातील आहेत. या सर्वामध्ये फडणवीस हे सर्वात तरुण आहेत. अजित पवार, उद्धव ठाकरे, भास्कर जाधव ही नेतेमंडळी ५० ते ५५ या वयोगटातील आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ६५ वयोगटातील असून, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे ५५ पेक्षा जास्त आहेत. अलीकडेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेले जनार्दन चांदूरकर हे साठीच्या वरील वयोगटातील आहेत. याचाच अर्थ काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेतृत्व तरुणांकडे आहे. शिवसेनेने तर आता आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व पुढे आणण्यावर भर दिला आहे.