स्थायी समितीला विकासकामांसाठी दिलेल्या निधीच्या असमान वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असतानाही भाजपच्या वाटय़ाला केवळ ६० कोटींचा निधी आल्यामुळे मुंबईतील ४० टक्के मुंबईक रांना विकासापासून वंचित राहावे लागणार आहे, असा आरोप भाजपने के ला आहे. तसेच हे निधी वाटप करताना गटनेत्यांची बैठकच झालेली नसून हे वाटप एकतर्फी असल्याचा आरोपही त्यांनी के ला आहे.

पालिके चा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना प्रशासनाने ६५० कोटींचा विकास निधी स्थायी समितीला दिला. या निधीचे राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार वाटप होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात शिवसेनेला २४५ कोटींचा भरघोस निधी देण्यात आला आहे. तर भाजपच्या वाटय़ाला के वळ ५९ कोटी आले आहेत. निधीच्या असमान वाटपावरून भाजपच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवरून बोचरी टीका के ल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ध्वनिचित्रफितीतून भाजपच्या नगरसेवकांवर आरोप के ला आहे. त्यामुळे सोमवारी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते  भालचंद्र शिरसाट आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटप कसे असमान आहे व त्यामुळे मुंबईचा विकास कसा रखडणार आहे याचा लेखाजोखा मांडला.

पालिके त शिवसेनेचे ९७ नगरसेवक असून १ कोटींची विकास निधी गृहीत धरून शिवसेनेला एकू ण ३४२ कोटींचा निधी मिळणार आहे. तर ८३ नगरसेवक असतानाही भाजपच्या वाटय़ाला एकू ण १४२ कोटींचाच निधी येणार आहे. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात के वळ दीड कोटींचा निधी मिळणार आहे. तर सेनेच्या किं वा महाविकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात मात्र चार कोटींची विकासकामे करता येणार आहेत, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभागात आणि विशेषत: भायखळा भागात जवळपास ४० कोटींचा निधी लहानसहान कामांसाठी वापरला जाणार आहे. त्यात झाडाच्या कुंडय़ांचे वाटप, ताडपत्रीचे वाटप अशी कामे केली जाणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. या वायफळ खर्चाची पोलखोल के ल्यामुळे जाधव यांनी सूडापोटी हे निधीचे वाटप एकतर्फी व अन्यायकारक पद्धतीने के ल्याचा आरोप त्यांनी के ला. मात्र असमान निधी वाटपाबाबत आवाज उठविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून प्रत्येक बैठकीत संबंधित विषयाच्या वेळी संधी मिळेल तेव्हा याबाबत जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीत झालेले निधी वाटप

* शिवसेना – ९७ कोटी + २४५ कोटी = ३४२ कोटी

* भाजप – ८३ कोटी + ५९ कोटी = १४२ कोटी

* काँग्रेस – २९ कोटी + ८१ कोटी = ११० कोटी

* राष्ट्रवादी काँग्रेस – ८ कोटी + २१ कोटी =  २९ कोटी

* समाजवादी पार्टी – ६ कोटी + १८ कोटी = २४ कोटी

* मनसे – १ कोटी + ० = ०१ कोटी

* एमआयएम – २ कोटी + ० = ०२ कोटी

एकूण  –  ६५० कोटी