‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये खरेदीसोबत बक्षिसे जिंकण्याची संधी

मुंबई : ‘पानिपत’ चित्रपटात ‘आनंदीबाईं’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना निपाणकर हिला भेटण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. ‘का रे दुरावा’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. सध्या ‘महारथी’ या नाटकातून तिने व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केले आहे. केवळ अभिनयच नाही तर अनेक सामाजिक कामांमध्ये ती आवर्जून सहभागी होते. नाटक, सिनेमासोबतच विविध मालिकांच्या निमित्ताने घराघरात पोहोचलेली अर्चना निपाणकर ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणार आहे. बुधवारी १२ फेब्रुवारीला दादर पश्चिम येथील राणेज् पैठणी या साडीच्या, तर पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स, एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात सायंकाळी ५ वाजता अर्चना भेट देणार आहे. यावेळी ग्राहकांनाही अर्चनाशी संवाद साधता येईल.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाला दमदार सुरुवात झाली आहे. नेहमीच्या खरेदीबरोबरच बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणारा असा हा महोत्सव असून यात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी मिळते.

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला ‘केसरी टूर्स’कडून सहलीचे पॅकेज हे पारितोषिक दिले जाणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार आहे.

कसे सहभागी व्हाल?

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयकासोबत एक कूपन दुकानदार देतील. तसेच दागिन्यांच्या ३ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक कूपन दिले जाईल. कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही. ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध केली जातील. अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ प्रस्तुत आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ आहेत. या महोत्सवासाठी ‘वाकडकर ज्वेलर्स’, ‘सी. ए. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘एम. व्ही. पेंडुरकर’, ‘अपना बाजार’, ‘राणेज् पैठणी’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. ‘स्वरा पैठणी’, ‘शिंदे शूज’ आणि ‘असमेरा फॅशन’ गिफ्ट पार्टनर तर, ‘साने केअर’ हार्ट केअर पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसुळूणकर ज्वेलर्स’ आणि ‘पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. तसेच  ‘एस. ए. इनामदार’, ‘पांडुरंग हरी वैद्य’ आणि ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ हे पावर्ड बाय पार्टनर आहेत.