News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

(संग्रहित छायाचित्र)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत मुंबई सेंट्रल स्थानकातून अटक केली. रामकुमार खडका (२८) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुमार चेंबूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी करीत होता. तो नेपाळचा नागरिक असून त्याच्या गावातील काही कुटुंबे चेंबूर-गोवंडी परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री तो नातेवाईकाकडे जेवणासाठी आला. शेजारच्या घरात नातेवाईकाची १२ वर्षांची मुलगी एकटीच असल्याचे पाहून तो त्या घरात शिरला आणि मुलीवर अत्याचार केला. यादरम्यान बाहेर गेलेले मुलीचे नातेवाईक घरी परतले. घडला प्रकार लक्षात येताच रामकुमारला त्यांनी घरीच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या भावासोबत त्याची झटापटही झाली. मात्र संधीचा फायदा घेऊन तो तेथून निसटला. पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पथकाने रविवारी मुंबई सेंट्रल स्थानकातून ‘गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस’ने पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या रामकुमारला ताब्यात घेत गोवंडी पोलिसांच्या हवाली केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:14 am

Web Title: arrested for raping minor girl abn 97
Next Stories
1 ‘आणखी पु. ल.’ विशेषांकाचे शनिवारी ठाण्यात प्रकाशन
2 फुटिरांवर फोडाफोडीची जबाबदारी!
3 मी राष्ट्रवादीतच
Just Now!
X