अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल मंजूर केला आहे. गवळीला १२ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तो २ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातून बाहेर राहू शकणार आहे. गवळीच्या आजारी पत्नीवर २५ ऑक्टोबरला शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठीच त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

याआधी विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोल अर्ज नाकारला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गवळीची ही याचिका अंशत: मंजूर करण्यात आली आहे.

अरुण गवळीच्या पत्नीला शनिवारी रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे. गवळीच्या पत्नीच्या गर्भाशयात गाठ आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यापूर्वी मागील वर्षी मुलाच्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर बाहेर आला होता.