नववर्षांत अरुण कोलटकरांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध
बॉम्बवर्षांव आणि अत्याचाराच्या भीतीमुळे दोन्ही हात पसरून वाट मिळेल तिथे धावत सुटलेल्या नग्न, असाहाय्य किम फुक या निष्पाप मुलीचे छायाचित्र व्हिएतनाम युद्धाचे भीषण, संहारी रूप अधोरेखित करते. ‘भिजकी वही’च्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र छापले जावे, अशी कोलटकरांची इच्छा होती; परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही, असे शहाणे म्हणाले. ‘भिजकी वही’ची पहिली आवृत्ती २००३ साली प्रकाशित झाली. वर्षभरातच कोलटकर यांचे निधन झाले.
नववर्षांत थोर मराठी-इंग्रजी कवी अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या गाजलेल्या आणि तब्बल चारशे पानी कवितासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ व्हिएतनाम युद्धावर आधारित एका गाजलेल्या छायाचित्राचे आहे. पुस्तकाच्या स्पाइनवर फोटो हा ‘प्रास प्रकाशन’चा मराठीतला पहिलाच प्रयोग आहे, असे जाणकार म्हणतात.
साम्राज्यखोर अमेरिकेने ७०च्या दशकात व्हिएतनामवर बेछूट आक्रमण करून त्या छोटय़ा, परंतु स्वाभिमानी देशावर बॉम्बहल्ला केला होता. त्यात होरपळून निघालेल्या एका नऊ वर्षांच्या मुलीचे जगभर गाजलेले छायाचित्र ‘भिजकी वही’च्या स्पाइनवर (पुस्तकाचा कणा) छापण्यात येणार आहे.
‘पुस्तकाच्या स्पाइनवर फोटो असणारे हे कदाचित जगातले पहिलेच पुस्तक असेल अन् मराठीत तर असा प्रयोग झालेला नाही,’ असे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘प्रास प्रकाशन’चे सर्वेसर्वा अशोक शहाणे म्हणाले.
किमचे दोन हाडकुळे हात ‘भिजकी वही’च्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर पसरले आहेत, तर तिचा इवलासा देह पुस्तकाच्या स्पाइनला रेलून उभा आहे. या फोटोमुळे स्त्रीच्या आदिम, चिरंतन दु:खाने उजळून निघालेल्या ‘भिजकी वही’ला वैश्विक आयाम मिळणार आहे.दरम्यान, कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती छापून आली.
मात्र तिसऱ्या आवृत्तीची जुळवाजुळव करताना शहाणे आणि नाटककार-चित्रकार वृंदावन दंडवते यांनी कोलटकरांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार केला. कोलटकर हे साठोत्तरी काळातले, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत महती मिळालेले कवी. त्यांच्या ‘जेजुरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाला १९७८ साली मानाचा कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला होता.‘प्रास प्रकाशन’ने ‘असोसिएटेड प्रेस’शी पत्रव्यवहार करून किम फुकच्या छायाचित्राचे रीतसर हक्कनुकतेच मिळवले, असे शहाणे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. गेल्या आठवडय़ात शहाणे आणि दंडवते यांनी दंडवत्यांच्या इर्ला इथल्या घरी मुखपृष्ठाच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या.

‘भिजकी वही’त किमवर तीन-चार कवितांचा गुच्छ आहे. कवितांचा शेवट कोलटकरांनी ‘किम/ क्षमा कर/ क्षमा कर/ कवीला’ असा केला आहे. अन् त्याला किमचे इंग्रजीत  It’s alright, Poet/ I forgive, forgive असे आहे. या दोन ओळी कवी आणि किमला एका धाग्यात ओवतात असेच वाचकाला वाटते, असे शहाणे म्हणाले.
बाईच्या हिश्शाला नेहमी दु:खच येते. सगळीकडे हजारो वर्षे हेच सुरू आहे. ‘भिजकी वही’त या दु:खाचा ठणका आहे. किम फुकच्याही वाटय़ाला वयाच्या नवव्या वर्षी दु:खच आले. तिचा काहीएक दोष नसताना अमेरिकेच्या युद्धखोरीमुळे तिचे कोवळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. किमचा फोटो सुंदर अन् कलात्मक आहे, असेही म्हणवत नाही.
– अशोक शहाणे, प्रास प्रकाशन

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार