मालाड, मालवणी येथे एका नऊ वर्षांच्या मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या ४७ वर्षांच्या इसमाला मालवणी पोलिसांनी अटक केली.  आई-वडिलांसोबत मालवणी परिसरात राहणाऱ्या या मुलीच्या शेजारी राहणारा हा इसम तिच्याशी लैंगिक चाळे करीत असे. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.