News Flash

एसटीत आता स्वयंचलित आग प्रतिबंधक प्रणाली

एसटी बस गाडीत लागणाऱ्या आगीच्या घटनाचा सखोल अभ्यास केला जात आहे.

एसटीत आता स्वयंचलित आग प्रतिबंधक प्रणाली

महामंडळाकडून आगीच्या घटनांची गांभीर्याने दखल

राज्यभरात एसटी बस गाडय़ांना लागणाऱ्या आगीच्या घटनाची गांभीर्याने दखल घेत महामंडळाकडून ‘स्वयंचलित आग ओळख आणि प्रतिबंधक प्रणाली’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे गाडीच्या इंजिन भागातील तापमानावर स्वयंचलित पद्धतीने नियंत्रण राहण्यासह इंजिन अधिक गरम झाल्याची माहिती उपलब्ध होणार आहे. गाडीच्या इंजिनाने पेट घेतल्यास त्याची माहिती यंत्रणेद्वारे चालकाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता येणार आहे. परिणामी एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असा दावा अधिकारी करत आहेत.

गेल्या दोन वर्षांत राज्यभरातील एसटीचे इंजिन गरम होऊन शॉर्ट सर्किट होणे, बॅटरी ते मुख्य स्विचच्या वायरचे घर्षण होऊन शॉर्ट सर्किट होणे आणि स्टार्टरमध्ये शॉर्ट सर्किट होणे अशा कारणांमुळे तब्बल १९ बस गाडय़ांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात गेल्या पाच महिन्यांत अशा घटना वारंवार होत असल्याने यात एसटीचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे एसटीची प्रतीमा मलीन होत आहे. परिणामी प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात घट वाढण्याच्या शक्यतेने एसटी बस गाडीत ‘स्वयंचलित आग ओळख आणि प्रतिबंधक प्रणाली’ बसवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. १०० हिरकणी बस गाडय़ात ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे.

एसटी बस गाडीत लागणाऱ्या आगीच्या घटनाचा सखोल अभ्यास केला जात आहे. याचधर्तीवर अत्याधुनिक ‘स्वयंचलित आग ओळख आणि प्रतिबंधक प्रणाली’ एसटीच्या बस गाडय़ात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षेत अधिक वाढ होईल.

– दिवाकर रावते, राज्य परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:25 am

Web Title: automatic fire prevention system in st bus
Next Stories
1 चालक बेदरकार, मुख्यमंत्र्यांचे क्षमस्व!
2 ‘कलर्स मराठी’वर आजपासून मराठमोळ्या पदार्थाची पंगत!
3 पावसात आनंदाला भरते..!
Just Now!
X