|| प्रसाद रावकर

खड्डे बुजवण्याच्या तंत्रज्ञानावरून पालिकेत खडाजंगी; ‘कोल्डमिक्स’च्या परिणामकारकतेबाबत शंका; ‘हॉटमिक्स’च्या अतिवापराच्या चौकशीचे संकेत

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु

पावसाच्या तडाख्यामुळे मुंबईतील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली असताना, मुंबई महापालिकेत खड्डे बुजवण्याच्या तंत्रज्ञानावरून खडाजंगी रंगत आहे. पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी शीतडांबरमिश्रित खडी (कोल्डमिक्स) वापरण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टीका सुरू झाली आहे. त्याच वेळी गेल्या चार वर्षांत गरम डांबरमिश्रित खडीच्या (हॉट मिक्स) अतिवापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहेत. गत चार वर्षांत हॉटमिक्सच्या वापराखातर पालिकेने २० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली असून या प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

पालिकेने गेल्या वर्षी रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रायोगिक तत्त्वावर कोल्डमिक्सने भरून चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे यंदा पालिकेच्या कारखान्यात कोल्डमिक्सची निर्मिती करून त्याचा वापर खड्डे बुजविण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वरळी येथील कारखान्यात आवश्यक ते बदल करून कोल्डमिक्सच्या निर्मितीस सुरुवात करण्यात आली. या कारखान्यांमध्ये उत्पादित करण्यात येणारे कोल्डमिक्स २८ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध झाले आहे. बाहेरील कंपन्यांकडे मिळणारे ‘कोल्डमिक्स’ या तुलनेत महाग असल्याने ते पालिकेच्या कारखान्यात तयार करण्याच्या निर्णयामुळे खर्चात बचत होणार आहे. जून आणि जुलैमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ३०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे.

दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि ते बुजविण्यासाठी वापरण्यात येणारी डांबरमिश्रित खडी वादाचा विषय बनली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये पावसाळ्यात हॉटमिक्सचा वापर करून खड्डे बुजविण्यात येत होते. या काळात हॉटमिक्सचा बेसुमार वापर करण्यात आला आहे. पावसाच्या तडाख्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी २०१४-१५ मध्ये ११,०५५.२५ मेट्रिक टन, २०१५-१६ मध्ये १०,७६६.४४ मेट्रिक टन, २०१६-१७ मध्ये १३,२६७.९२ मेट्रिक टन, २०१७-१८ १०,०२६.२४ मेट्रिक टन हॉटमिक्सचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी पालिकेने अनुक्रमे ५.५२ कोटी, ५.३८ कोटी, ६.६३ कोटी आणि ५.०१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली.

मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स कुचकामी ठरत असल्याचा आरोप करीत काही राजकीय मंडळींनी गळा काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर हॉटमिक्सचा वापर बंद झाल्यामुळे पूर्वी त्याचा पुरवठा करणाऱ्यांनी काही मंडळींना हाताशी धरून तलवारी उपसण्यास सुरुवात केली आहे. हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स असा नवा वाद पालिकेत रंगू लागला आहे.

कोल्डमिक्स खड्डय़ात टिकाव धरत नसल्याची ओरडही होऊ लागली आहे. अतिमुसळधार पावसामध्ये बुजविण्यात येणाऱ्या खड्डय़ात कोल्डमिक्स टिकत नसल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली, परंतु रिमझिम पावसात अथवा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळताना बुजविलेल्या खड्डय़ातून हॉटमिक्स उखडले जात असल्याचेही या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

गेल्या चार वर्षांमध्ये पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर हॉटमिक्सचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात सखोल अहवाल मागविण्यात येईल.    – अजोय मेहता, पालिका आयुक्त