News Flash

शिवसेनेच्या बदलापूर उपशहरप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

शिवसेनेचे बदलापूर उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कात्रप येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.

| May 24, 2014 03:34 am

शिवसेनेचे बदलापूर उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कात्रप येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ दिवसभर बदलापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राऊत यांच्या पत्नी विजया आणि भावजय शीतल नगरसेविका आहेत. कात्रप परिसरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात राऊत बसले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. दरम्यान, या हत्येप्रकरणी रात्री उशीरा आमदार किसन कथोरे यांच्यासह योगेश राऊत, जगदीश राऊत, समीर धारवे, रमेश पाटील, पप्पू मोरे, देवेंद्र मालुसरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:34 am

Web Title: badlapur deputy shiv sena president shot dead
Next Stories
1 बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी उपायुक्तास अटक
2 ‘म्हाडा’कडून आठ इमारती अतिधोकादायक जाहीर
3 दलितांवरील अत्याचारांविरोधात आंबेडकरी संघटना रस्त्यावर
Just Now!
X