सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणाऱ्या DSP ला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे करोनाबाधित झाले आहेत. त्रिमुखे यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाही करोनाची लागण झाली आहे.

DSP त्रिमुखे पर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले होते. तसेच सुशांतच्या आत्महत्यानंतर रियानं वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधला होता. चार फोन कॉल्स आणि एक एसएमएसद्वारे या दोघांमध्ये संपर्क झाला होता.

देशात करोनाबाधित राज्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. राज्यातील करोनाबाधित आणि करोनबळींची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत, नेते आणि आधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात १४ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.