20 November 2017

News Flash

मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 7:57 PM

बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग

मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. क्रेनच्या मदतीने आगीपर्यंत पोहोचून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येतो आहे.

उच्च न्यायालयासमोरील ज्या इमारतीला आग लागली, त्या इमारतीत बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक मुख्यालय आहे. बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे या इमारतीत आहेत. त्यामुळे या आगीत कागदपत्रांचे आणि बँकेतील इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

First Published on April 21, 2017 5:18 pm

Web Title: bank near mumbai high court catches fire