प्रवाशांच्या तक्रारीवरून बेस्ट समितीत सदस्यांची नाराजी

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या मदतीसाठी आलेल्या एसटीच्या गाड्या अस्वच्छ असल्याने प्रवाशांना त्रास होतो. यावरून गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त के ली. बेस्टच्या ताफ्यात गाड्या येताना त्या स्वच्छ असाव्यात, अशी मागणी सदस्यांनी के ल्यानंतर बेस्ट महाव्यवस्थापकांनी याची माहिती एसटी महामंडळाला दिली जाईल, असे आश्वाासन दिले.

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने टाळेबंदीत बेस्ट व एसटी महामंडळानेच सेवा दिली. हळूहळू बेस्टच्या गाड्यांना वाढलेली गर्दी, बसची अपुरी संख्या, त्यामुळे तासन्तास बसची प्रतीक्षा करण्यास लागत असल्याने बेस्टने एसटीच्या गाड्या ताफ्यात दाखल  करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक हजार गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे बेस्टच्या गाड्यांना होणारी गर्दी काहीशी कमी झाली आहे.

परंतु एसटी महामंडळाकडून बेस्टच्या ताफ्यात दिलेल्या गाड्या अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची साफसफाई होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पालिके तील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अस्वच्छ एसटीमुळे प्रवासी नाराज असल्याचे सांगितले. त्यांची स्वच्छता करूनच त्या ताफ्यात दाखल करण्याची मागणी के ली.

या बस प्रत्येक किलोमीटरमागे  ७५  रुपये या दराने भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. प्रासंगिक करारावर बस ४५ रुपये किलोमीटर दराने दिली जाते. त्यामुळे एसटीच्या बस एवढ्या महाग दराने घेताना त्याची स्वच्छताही तशीच ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही हाच मुद्दा मांडत प्रवाशांच्या सेवेत येणाऱ्या एसटी स्वच्छ असल्या पाहिजेत, अशी  मागणी के ली. यावर बेस्ट उपक्र माचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कु मार बागडे यांनी सामान्यांना लोकल प्रवेश नसल्याने व वाहतुकीत बेस्टच्या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने  एसटीची मदत घेण्यात आली आहे. मात्र येणाऱ्या गाड्या अस्वच्छ असल्याने त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाला याबाबत निदर्शनास आणून  दिले जाईल, अशी माहिती दिली.