ठाण्यात राहणाऱ्या आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या कृष्णा कोबनाक यांना पक्षाच्या नावाने एका अनोळखी व्यक्तीने एक लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली. या प्रकरणी कोबनाक यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या कृष्णा कोबनाक यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीवर्धन मतदार संघातून भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. १२ ऑक्टोबरला कृष्णा हे श्रीवर्धन येथे निवडणुकीचा प्रचार करीत होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने भाजप मुख्यालयातून बोलत आहे. पक्षाकडून निवडणूक फंड म्हणून ५० लाख रुपये मिळणार आहेत. हे पैसे मिळण्यासाठी एलेक्स गारमेंट नावाने आयसीआयसीआय बॅंकेच्या नवी दिल्लीतील खात्यात १ लाख रुपये पैसे भरण्यास फोनवरील व्यक्तीने सांगितले. कृष्णा यांनी या फोनवर विश्वास ठेऊन बॅंक खात्यात १ लाख रुपये भरले. मात्र त्यानंतर तो फोन क्रमांक बंद झाला. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा यांनी वर्तकनगर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2015 12:03 pm