News Flash

ठाण्यातील भाजप नगरसेविका दुलानी यांचे पद धोक्यात

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र जप्त करून रद्द

| November 8, 2012 03:05 am

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याचे तसेच बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोकण विभाग जातपडताळणी समितीने दिले आहेत.  त्यामुळे दुलानी यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
दुलानी यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या अ‍ॅड. अरुणा भुजबळ यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर अरुणा भुजबळ यांनी दुलानी यांच्या जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने दुलानी यांचे जाती प्रमाणपत्र पडताळणी पुन्हा करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविले होते.कोकण विभागीय जातपडताळणी समितीने चौकशीनंतर दुलानी यांच्यावर कारवाई करण्याचे वरील आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2012 3:05 am

Web Title: bjp corporator dulani post in danger
टॅग : Bjp,Corporator,Thane
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळासाठी वन जमिनीचा अडसर दूर
2 अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा
3 भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण ठार
Just Now!
X