करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात सांगितेले आहे. यावरूवन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला आहे.

“राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारने तर कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले. मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा- “ठाकरे सरकारच्या बालहट्टासाठी पाच हजार कोटी अधिक मोजावे लागणार”

तर, “सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली पण करोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले” असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जेशी यांनी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे. “करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते.