27 February 2021

News Flash

आमदारकीसाठी व मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी पंतप्रधानांना फोन केला होता, मग आता… – भातखळकर

मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाणा; पुढच्या फेसबुक लाईवमध्ये जमल्यास नवं काही तरी बोला. तेच तेच ऐकून उबग आलाय, असं देखील म्हणाले.

“कांजूरमार्गच्या जमिनीसाठी भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटावे असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. आमदारकी मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना फोन केला होता, मग कांजूरमार्गच्या जागेसाठी का करू शकत नाहीत?” असा सवाल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यामध्ये त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत कारशेडच्या मुद्यावरून भाजपाला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून, ज्यामध्ये ते म्हणतात, “मुख्यमंत्री आम्हाला आवाहन करत आहेत की आम्ही केंद्राला सांगाव. मुख्यमंत्री महोदय आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत राहण्यासाठी व आमदारकी मिळवण्यासाठी तुम्ही जसा आपणहून त्यावेळी पंतप्रधानांना फोन केला होता. तसा आता करायला काय हरकत आहे? मुंबईकरांसाठी व महाराष्ट्रासाठी फोन करा, त्यांना विनंती करा. पण मुळात केंद्र सरकार यामध्ये आडकाठी आणतच नाही, हे आपल्याला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे कृपया विरोधकांवर असे खोटे व चुकीचे आरोप करू नका.”

तसेच, “कारशेडच्या जागेसाठी स्वतः नियुक्त केलेल्या सौनक समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी का फेटाळला हे त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे. आपल्या चुका झाकण्यासाठी केंद्रावर सतत खोटरडी टीका करून त्यांची सुटका होणार नाही. पुढच्या फेसबुक लाईवमध्ये जमल्यास नवं काही तरी बोला. तेच तेच ऐकून उबग आलाय.” असं देखील भातखळकर म्हणाले आहेत.

तर, “ मेट्रो कारशेड आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांना आवाहन केलं होतं.

होय! मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी : उद्धव ठाकरे

मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे.

अहंकारातून मुंबईकरांचं नुकसान; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “अभिमान आणि अहंकार यात अंतर असतं. मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून आपण मुंबईकरांच नुकसान करत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन आपण करत आहात. त्या ठिकाणी कारशेड होण्यातल्या अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूरचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही.” असं उपाध्ये म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 2:52 pm

Web Title: bjp leader atul bhatkhalkhar targets chief minister uddhav thackeray msr 87
Next Stories
1 लाव रे तो व्हिडीओ! भाजपा-मनसे युतीवर भाई जगताप म्हणाले…
2 …म्हणून कंत्राटदार प्रेमाची, बालहट्टाची लाट आवरा! – शेलार
3 अकरावीची विशेष प्रवेश यादी गुरुवारी
Just Now!
X