News Flash

‘राम’ नव्हे ‘रावण’, राम कदम यांच्यावर मनसेचा पोस्टर’वार’

घाटकोपरमध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेने बॅनर लावले. हे बॅनर पहाटे पोलिसांनी काढले.

‘राम’ नव्हे ‘रावण’, राम कदम यांच्यावर मनसेचा पोस्टर’वार’
मनसेने घाटकोपरमध्ये आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले.

मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने बॅनरबाजी केली. घाटकोपरमध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेने बॅनर लावले. हे बॅनर पहाटे पोलिसांनी काढले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांना एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्यावर टीका केली आहे. तर मनसेने बॅनरबाजी करत राम कदम यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. मनसेने घाटकोपरमध्ये आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले.

‘वाह रे भाजपा सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार, मतदारांनो आपल्या मुलीला सांभाळा. स्वयंघोषित दयावान आणि डॅशिंग भाजपा आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहेत. जर आमदार किंवा त्यांच्या समर्थकांनी असे केले तर पोलिसांकडे तक्रार करा आणि आम्हालाही कळवा’, असे या बॅनरवर म्हटले आहे.

बॅनरचे वृत्त समजताच पहाटे पोलिसांनी घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या निवासस्थानासमोर आणि मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर लावलेले बॅनर काढून टाकले. घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 8:15 am

Web Title: bjp mla ram kadam kidnap girl for men statement mns poster in ghatkopar mumbai
Next Stories
1 दादागिरीला कंटाळून अल्पवयीन मुलाने केली गुंडाची हत्या
2 आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर काँग्रेसवर फोडणे हा पंतप्रधान मोदींचा पांचटपणा-शिवसेना
3 ‘मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करा’
Just Now!
X