News Flash

भाजप- शिवसेनेत पाण्यावरून कलगीतुरा

भाजपने मंगळवारी पालिका सभागृहात शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

टँकरमधून होणारी पिण्याच्या पाण्याची चोरी आणि शिवसेनेत दाखल झालेल्या माजी नगरसेवकाच्या भावाविरुद्ध पाणीचोरीप्रकरणी दाखल झालेला गुन्हा या मुद्दय़ांवरून भाजपने मंगळवारी पालिका सभागृहात शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणीचोरीला आळा बसविण्यात प्रशासन अपयशी ठरले असून त्यांचे प्रमुख या नात्याने आयुक्तांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा इशारा देत शिवसेनेने भाजपलाच गोत्यात आणले. या विषयावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा रंगला होता.
मुंबईमध्ये टँकरमधून पिण्याच्या पाण्याची चोरी करण्यात येत असून या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. कोटक यांनी वारंवार मागणी केल्यामुळे अखेर महापौर स्नेहल आंबेकर यांनी त्यांना परवानगी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 12:02 am

Web Title: bjp shiv sena in water war
टॅग : Bjp,Shiv Sena
Next Stories
1 रुग्णवाहिका चालक नसल्याने अपघातग्रस्ताचा मृत्यू
2 उधळलेल्या घोडय़ामुळे एक जखमी
3 त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती – राम नाईक
Just Now!
X